जाहिरात-9423439946
अर्थकारण

डॉलरच्या मजबुतीमुळे विदेशी गुंतवणूकदार सावध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः

भारतीय शेअर बाजाराबाबत विदेशी गुंतवणूकदारां(एफपीआय)चा दृष्टिकोन सावध आहे; मात्र स्थलांतराचा वेग निश्‍चितच मंदावला आहे. या महिन्यात आतापर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून सात हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत. अमेरिकेतली मंदीची भीती आणि डॉलरच्या सततच्या मजबुतीमुळे ‘एफपीआय’ विक्रेते झाले आहेत. यापूर्वी जूनमध्ये ‘एफपीआय’ने भारतीय समभागातून ५० हजार २०३ कोटी रुपये काढले होते. दुसरीकडे डॉलरच्या मजबुतीमुळे सॉफ्टवेअर निर्यातदारांचा फायदा झाला आहे.

“या वर्षात आतापर्यंत ‘एफपीआय’ ने भारतीय शेअर बाजारातून २.२५ लाख कोटी रुपये काढले आहेत. ही विक्रमी पातळी आहे. यापूर्वी २००८ मध्ये त्यांनी ५२ हजार ९८७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. याशिवाय ‘एफपीआय’ ने समीक्षाधीन कालावधीत कर्ज किंवा रोखे बाजारातून ८७९ कोटी रुपये काढले आहेत.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार गेल्या दहा महिन्यांपासून शेअर बाजारातून पैसे काढत आहेत. या वर्षात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून २.२४ लाख कोटी रुपये काढण्यात आले आहेत. ‘एफपीआय’च्या विक्रीचा वेग मंदावला असला तरी गोष्टी फारशा बदललेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वृत्तीतल्या बदलाचं ते निदर्शक नाही. गेल्या नऊ महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढली आहे. डॉलर मजबूत होईपर्यंत ही स्थिती कायम राहील. ‘जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे मुख्य गुंतवणूक धोरण संशोधक व्ही. के. विजयकुमार म्हणाले, परकीय चलन बाजाराभोवती अनिश्‍चितता आणि डॉलरच्या सततच्या मजबुतीमुळे, भारतीय बाजारपेठेत ‘एफपीआय’ आक्रमकपणे खरेदी करतील अशी शक्यता नाही.

‘कोटक सिक्युरिटीज हेड इक्विटी रिसर्च’ (रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले की, पुढे जाऊन ‘एफपीआय’ गुंतवणूक अस्थिर राहील. भू-राजकीय जोखीम, वाढती चलनवाढ आणि मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक धोरण कडक केलं गेल्यामुळे ‘एफपीआय’ उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विक्रेतेच राहतील. जूनमध्ये ‘एफपीआय’ने बाजारातून ५० हजार कोटींहून अधिक रक्कम काढली होती. डिपॉझिटरी डेटानुसार, १-१५ जुलै दरम्यान ‘एफपीआय’ ने भारतीय बाजारातून निव्वळ ७,४३२ कोटी रुपये काढले. जूनमध्ये ‘एफपीआय’ने ५० हजार २०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मार्च २०२० नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. त्या वेळी ‘एफपीआय’ ने ६१ हजार ९७३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. या वर्षात आतापर्यंत ‘एफपीआय’ ने भारतीय शेअर बाजारातून २.२५ लाख कोटी रुपये काढले आहेत. ही विक्रमी पातळी आहे. यापूर्वी २००८ मध्ये त्यांनी ५२ हजार ९८७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. याशिवाय ‘एफपीआय’ ने समीक्षाधीन कालावधीत कर्ज किंवा रोखे बाजारातून ८७९ कोटी रुपये काढले आहेत.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा उद्योगांवर संमिश्र परिणाम होत आहे. काहींना याचा फटका बसत आहे तर सॉफ्टवेअर निर्यातदारांसह काही क्षेत्रांचा नफा कायम राहण्याची अपेक्षा आहे. आता रुपया ८० रुपये प्रति डॉलरच्या मानसशास्त्रीय पातळीच्या जवळ पोहोचला आहे आणि अमेरिकेत ऐतिहासिक उच्चांक गाठला गेला आहे. अमेरिकेतली प्रमुख बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे रुपया नरम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात मोबाईल फोन महाग होईल. रुपयाच्या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयात केलेल्या वस्तूंवर होईल. या श्रेणीत सर्वाधिक मागणी असलेली वस्तू म्हणजे मोबाईल फोन. ‘इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन’ (आयसीईए) चे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनी सांगितलं की, रुपयातल्या एक टक्का घसरणीचा मोबाईल फोन पुरवठा साखळीवर ०.६ टक्क्यांनी परिणाम होतो आणि तो आयात केलेल्या घटकांमुळे होतो. पाच टक्क्यांच्या घसरणीचा एकूण नफ्यावर तीन टक्क्यांनी परिणाम होतो. या प्रमाणात किंमतवाढही होते.

मोहिंद्रू पुढे म्हणाले की, आयात महाग झाली आहे; पण चांगली गोष्ट म्हणजे वस्तूंच्या किमती नरमायला लागल्या आहेत. रुपयाच्या घसरणीच्या सॉफ्टवेअर क्षेत्रावरील परिणामावर भाष्य करताना, देशांतर्गत रेटिंग एजन्सी ‘इक्रा’चे सहाय्यक उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट रेटिंगचे प्रमुख दीपक जोतवानी म्हणाले की, उद्योगाच्या महसुलाचा मोठा हिस्सा डॉलरमध्ये येतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे उद्योगाच्या महसूलवाढीला चालना मिळाली आणि मार्जिन वाढलं. रुपयाच्या घसरणीच्या स्टील उद्योगावर होणार्‍या परिणामावर ‘इंडियन स्टील असोसिएशन’चे सरचिटणीस आलोक सहाय म्हणाले की, उत्पादनात स्टील हा महत्त्वाचा घटक असला तरी कोकिंग कोळसा आणि रुपयातल्या घसरणीमुळे आयात केलेला कोळसा अधिक महाग होईल. रुपयाच्या घसरणीमुळे आयात केलेले घटक महाग होणार असल्याचं ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे आयात महाग होईल आणि ऊर्जा मिश्रणात अक्षय्यांचा वाटा वाढवण्याची गरजही वाढेल. ‘मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’चे संचालक संजय भुतानी म्हणाले की रुपयाच्या अवमूल्यनाने उद्योगांसमोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची आयात महाग झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close