जाहिरात-9423439946
अपघात

रस्ते अपघातात महिला ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या टिळेकर वस्ती येथील रहिवासी महिलेला दि.२४ मार्च रोजी एका अज्ञात ट्रॅक्टरने जोराची धडक देऊन त्यात येथील महिला जानकीबाई नाना कसबे (वय-८०) यांचे निधन झाले आहे.या घटनेबाबत मयत महिलेचा मुलगा अंतवन नाना कसबे (वय-५८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र

दि.२४ मार्च रोजी सायंकाळी ०५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव-येवला रस्त्याने टिळेकर वस्ती नजीक स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन पायी जात असताना टिळेकर वस्तीजवळ कोणातरी अज्ञात वाहनाने व त्यावरील चालकाने रास्त्याचे स्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी केले त्यात त्यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अंतवन कसबे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपली आई हि गुरुवार दि.२४ मार्च रोजी सायंकाळी ०५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव-येवला रस्त्याने टिळेकर वस्ती नजीक स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन पायी जात असताना टिळेकर वस्तीजवळ कोणातरी अज्ञात वाहनाने व त्यावरील चालकाने रास्त्याचे स्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी केले त्यात त्यांचे निधन झाले आहे.या अपघाता नंतर अज्ञात चालक इसम कोणतीही खबर न देताच पसार झाला आहे.या अपघातात आपल्या आईचे निधन झाले आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७१/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ)(ब) १७७ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close